भुसावळ (प्रतिनिधी) केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार व शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत असून आता भुसावळ येथील आयुध निर्माणी कंपनीतील कर्मचारी इतर कामगार संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. या बंदला आयुध निर्माणी कंपनीचा पाठिंबा आहे, असे संरक्षणमधील अग्रणी ऑल इंडिया डिफेंन्स एम्लॉईज फेडरेशन (AIDEF)चे उपाध्यक्ष व कामगार नेते राजेंद्र झा यांनी दिली आहे.
येथे गुरुवार रोजी संपुर्ण देशात १० प्रमुख केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे देशव्यापी १ दिवसीय संपाची हाक दिली गेली असून भारत सरकारचे कर्मचारी, विरोधी निती, शेतकरी, जन व राष्ट्र विरोधी निर्णयचे विरोधात पुकारण्यात आला. यात सर्व केंद्रीय संघठन, राज्य सरकारी संगठन, पब्लिक प्रायव्हेट सेक्टरचे संघटना, आंगनबाड़ी, आशावर्कर, ठेलामजुर, ट्रान्सपोर्ट, टॅक्सी अशा विविध संस्था मार्फत १ दिवसीय संप यशस्वी पुकारण्यात आला. यात सुमारे २५ करोड कर्मचारि-यांच्या सहभागी होण्यासाचा अंदाज व्यक्त केला केला, संरक्षण मधिल अग्रणी ऑल इंडिया डिफेंन्स एम्लॉईज फेडरेशन (AIDEF) ने या संपास सशर्त पाठिंबा दिला असल्याची माहिती AIDEF चे उपाध्यक्ष व कामगार नेते राजेंद्र झा यांनी दिली आहे.
आयुध निर्माणी भुसावळ येथे कर्मचारि-यांनी केले निदर्शने गुरुवार रोजी केंद्रीय कर्मचारी महासंघ द्वारे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी १ दिवसीय संपाचे पाठिंबा देणेसाठी व सरकार द्वारे आयुध निर्माणींचे निगमिकरण रद्द करणेसाठी सरकारचे लक्ष वेधले. संरक्षण मध्ये कार्यरत AIDEF, INDWF, BPMS चे संयुक्त राष्ट्रीय समिती चे आदेशा नुसार, सकाळी कामावर जाते वेळी सर्व कामगारांनी मुख्य द्वार आयुध निर्माणी भुसावळ येथे नारेबाजी, निदर्शने करून सरकार चे लक्ष वेधले गेले. स्थानिक संयुक्त समितीचे संयुक्त निर्णयानुसार या १ दिवसीय देशव्यापी संपास पाठिंबा देत सरकार चे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. अशी माहिती स्थानिक संयुक्त समिती चे संयोजक दिनेश राजगिरे यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑ फॅ कामगार युनियन चे किशोर पाटील, नवल भिडे, प्रविण मोरे, आनि कर्मचारी संघाचे लक्ष्मण वाघ, पप्पु राजपुत, अनिल सोनावणे, मजदुर युनियन इटंक चे मधुकर राऊत, किशोर चौधरी, प्रशांत सपकाळे समेत एससी एसटी ओबीसी मा. असो एवं बिएसकेएस संघटना चे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.