नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जामिनावर सुटलेले रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.