नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड संस्थेची माफी स्वीकार करत त्यांच्या विरोधात सुरू असलेला मानहानीचा खटला बंद केला. यापुढे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पतंजलीच्या उत्पादनांची जाहिरात करताना योग्य ती खबरदारी घेतली जाईल. तसेच औषधांच्या परिणामांचा दावा करणाऱ्या कोणत्याही उपचार पद्धतीबाबत वक्तव्य केला जाणार नाही, अशी हमी पतंजली आयुर्वेदने दिल्याचे कंपनीचे वकील गौतम तालुकादार यांनी सांगितले.
न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसनुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने पतंजली आयुर्वेद कंपनीची माफी स्वीकारली आणि त्यांच्या विरोधातील खटला बंद केला. रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली समूहासाठी हा मोठा दिला आहे. पतंजलीच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात भारतीय वैद्यकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १७ ऑगस्ट २०२२पासून सुनावणी सुरू होती. कोरोना लसीकरण आणि अॅलोपॅथी उपचार पद्धतीला बदनाम केल्याचा आरोप आयएमएने केला