मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला आहे.
सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला NCB ने अटक केली होती. महिनाभर पोलीस कोठडीत राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, यावेळी रियाला पासपोर्ट अमलीपदार्थ विरोधी पथकाककडे (NCB) जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रियाला पोलिसांच्या परवानगी शिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियासोबत सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालायने NCB ने ड्रग्स प्रकरणातच अटक केलेल्या रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शौविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.