मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी विविध देशातून ८० हजार फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहेत, अशी धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.
फॉरेन्सिक तपासात एम्सच्या ७ सदस्यांच्या पॅनलने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की, सुशांतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे. परंतू मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी ८० हजार फेक अकाऊंट ओपन करण्यात आले. तसेच काही अकाऊंट तर असे आहेत जे २०१० मध्ये तयार केले आहेत. मात्र त्यांना आता ऍक्टिव दाखवण्यात येत आहे. या सर्व अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले. याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने या फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे फेक अकाऊंट भारतातील नसून हे इटली, थायलँड, फ्रान्स, इंडोनेशिया, टर्की सारख्या देशातून ऑपरेट केले जात होते.