TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
February 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी -: रात्रीच्या सुमारास तीन वर्षीय बालकाला उचलून त्याला घेवून जात असल्याच्या संशयावरुन ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने पब्लिक मार दिला. या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा, खु, ता. जळगाव) हे वास्तव्यास आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ३० ते ३५ वर्षीय अनोळखी मनोहर सोनवणे यांच्या तीन वर्षीय बालकास उचलून घेऊन जात असल्याचा त्यांना संशय आला. त्या कारणावरुन मनोहर सोनवणे यांच्यासह १५ ते २० जणांच्या जमावाने त्या संशयित तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या मारहाणीत एकाने काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये अनोळखी तरुणाच्या डोक्यावर, हाता, पायावर व डोळ्याजवळ जबर दुखापत झाल्यामुळे तो रस्त्यावर पडलेला होता.

READ ALSO

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

रक्तबंबाळ अवस्थेत होता पडलेला

बेदम मारहाणीत तरुण जिनिंगजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ रामकृष्ण इंगळे, गुलाब माळी, धनराज पाटील, विजय निकम, कैलास इंगळे, श्रीकांत बदर हे घटनासथळी दाखल झाले.

उपचार सुरु असतांना झाला मृत्यू

पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या अनोळखी तरुणाला तात्काळशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्या अनोळखी

तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. पाच जणांना केली अटक

पब्लिक मारमुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोहेकॉ रामकृष्ण इंगळे, श्रीकांत बदर, गुलाब माळी, धनराजपाटील, पोलिस नाईक विजय निकम, कैलास इंगळे, प्रदीप राजपूत हे संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. त्यांनी संशयित मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल, ह.मु. लिंबायत, सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल), अफताब आरीफ खाटीक (रा. कुंभारवाडा, शनिपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रावण मासनिमित्त धरणगावात भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन !

August 30, 2023

व्हेंटिलेटर बदनामी प्रकरण : न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सकांची याचिका दाखल !

January 20, 2022

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025

तर उन्मेष पाटील यांना आता त्यांच्यात भाषेत उत्तर दिले जाईल : चंदन पाटील !

May 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group