जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या निवडणुकीत १३८ अपक्षांना शनिवारी चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये कोणाला वाहन, कोणाला घरगुती वापराचे साहित्य तर कोणाला फळभाज्या, इलेक्ट्रीक वस्तु, म्यूझिकल ईस्टूमेंट अशा विविध चिन्हांचे वाटप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह १३८ अपक्ष उमेदवार रिणात आहेत. राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी न मिळालेल्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करत त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांना आव्हाण दिले आहे. या सर्व अपक्ष उमेदवारांना बॅट, ऑटो रिक्षा, गॅस सिलेंडर, शिलाई मशिन, नारळ, विटा, शिटी, छत्री, कपबशी, एअर कंडिशनर, नगारा, पुस्तक, कपाट, सपरचंद, कपबशी, फुटबॉल, ट्रॅक्टर, रोड रोलर, बादली, छताचा पंखा, दातांचा ब्रश, हॉकी स्टीक, पुस्तक, हेलिकॉप्टर, स्कुटर, कॅमेरा, सुर्यफुल, फुगा, लॅपटॉप, कात्री, नारळ, चष्मा, छत्री आदी चिन्हांचे वाटप करण्यात आले, यामध्ये शिटी, नारळ, कपबशी, फुटबॉल, ट्रॅक्टर, रोड रोलर, पंखा यासारख्या चिन्हांना अपक्ष उमेदवारांकडून पसंती देण्यात आलेली दिसून येत आहे.
३२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांच्या निवडणुकीसाठी १०३८ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. त्यापैकी ३३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार असून यापैकी शिवसेनेच्या ६ आणि भाजपाच्या ६ जागा बिनविरोध निश्चित झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने ४५, शिवसेना शिंदे गटाने २३, शिवसेना ठाकरे गटाने ३४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने २१, काँग्रेसने १९, समाजवादी पार्टीने ८ व एमआयएमने ८, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ६ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते, त्यापैकी सेना भाजपचे १२ उमेदवारांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे















