TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा ; ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

पत्रकाराला बेकायदा दिलेल्या नोटीसचा निषेध ; चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पत्रकाराला दिलेल्या नोटीसचा निषेध व्यक्त करत धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन आज ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असल्याबाबतची माहिती कांडेलकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याबाबत एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून धरणगाव तहसीलदार यांना महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे दुय्यम अधिकारी चौकशी कशी करतील ?, असा सवाल मुख्य तक्रारकर्ते श्री.कांडेलकर यांनी उपस्थित केला होता.
याच संदर्भातील बातमी सर्व पत्रकारांनी छापली होती. हीच बातमी दैनिक लोकमतमध्ये धरणगाव येथील पत्रकार कल्पेश महाजन यांनी दि. ४ / १० / २२ रोजी प्रकाशित केली. सदर बातमी प्रकाशित केल्याचा वैयक्तिक राग मनात धरून धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांनी पत्रकार कल्पेश महाजन यांना अब्रुनुकसानीची नोटीस तत्काळ धरणगाव तलाठी आणि कोतवाल यांना तातडीने पाठवून पत्रकार कल्पेश महाजन यांच्या घरी पाठविले. कल्पेश महाजन घरी नसतांना तलाठी यांनी कल्पेश महाजन यांना घरावर नोटीस चिपकाविण्याची धमकी दिली.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

वास्तविक तहसीलदार नितीन देवरे यांनी सदर बातमी व्यकीशः व्यक्तीद्वेष घेत पत्रकारास नोटीस देण्याचा कुठलाही संबंध नसतांना पत्रकारास नोटीस दिली आहे. कारण धरणगावात लोकमतचे दोन प्रतिनिधी आहेत. त्यामुळे संबधित बातमी कोणत्या पत्रकाराने पाठवली?, याची लोकमत कार्यालयकडून कोणतीही माहिती न घेता कल्पेश महाजन यांना दिलेली नोटीस म्हणजे तहसीलदार श्री. देवरे यांच्याच मनात संबधित पत्रकाराविषयी आकस असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, पीआरबी कायद्यानुसार कोणत्याही वृत्तपत्रात प्रसारित होणाऱ्या बातमीची जबाबदारी हि संपादकाची असते. तरीही सदरची नोटीस पत्रकारास देणे म्हणजे हे व्यक्ती द्वेष असल्याचे दिसून येते. पीआरबी कायद्यानुसार बातमीची जबाबदारी संपादकांची असते, असे वृत्तपत्रात दररोज प्रेस लाईनमध्ये प्रकाशित केलेले असते. तरी देखील पत्रकाराला नोटीस पाठवणे, गैरकायदा कृत्य आहे. वजा पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जेनवाल यांनी दिली. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, जिल्हाकार्याध्यक्ष विकास भदाणे, साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, विजय वाघमारे, रवींद्र नवाल, छगनसिंग पाटील, मौलाना रिजवान, तय्यब पटेल, आनंद शिंपी हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना बडतर्फ करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

April 14, 2022

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन !

September 4, 2023

भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे घसरले ; मध्यरात्रीपर्यंत रूळाची दुरुस्ती पूर्ण, मार्ग खुला !

June 10, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group