धरणगाव (प्रतिनिधी): सकल मराठा समाज व अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे पोलिस अधिकारी किरण बकाले यांच्या निंदनीय आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी धरणगाव पोलीस उपनिरीक्षक पवार यांना निवेदन देण्यात आले.
सदर प्रसार माध्यमातून प्रसार झालेली ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात असणे म्हणजे जातीयवादाला निंदनिय आहे.सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ठेवावी व सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून दुसरा कोणीही व्यक्ती मराठा व इतर कोणत्याही समाजांवर आक्षेपार्ह बोलण्याची हिम्मत करणार नाही अन्यथा येणाऱ्या काळात मराठा समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
याप्रसंगी धरणगाव पोलिस उपनिरीक्षक पवार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा श्री राम सेना व करणी सेनेचे कार्याध्यक्ष प्रथम सूर्यवंशी व अजिंक्यक्रांती फाऊंडेशन चे संस्थापक संदिप जाधव तसेच कार्यकारणी सदस्य निखिल धनगर,गणेश धनगर,सागर पाटील,राहुल धनगर,रोहन राजपूत,सचिन धनगर आदी उपस्थित होते.