जालना (वृत्तसंस्था) जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे तक्रारदार तक्रारदार यांच्या नावावर करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेकटा येथे तलाठी महिला एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. सरीता प्रदीप पाटील (तलाठी, करंजगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. ऑडीटर सोसायटी, मयूरपार्क हसूल) असे लाच घेणाऱ्या तलाठी महिलेचे नाव आहे. जालना एसीबी पथकानेही कारवाई केली.
तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेली करंजगाव शिवारातील शेत जमीन वाटणी पत्रकानुसार तक्रारदाराचे नावाने केली म्हणून फेर करण्याअगोदर १० हजारांची लाच मागितली. दीड महिन्यांपूर्वी ५ हजार घेतले होते. बाकी राहिलेले ५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती ३ हजार रूपये लाच स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य करून लाच पंचासमक्ष स्वतः स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने तलाठी सजा कार्यालय शेकटा येथे रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी करमाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळ्याची कार्यवाही पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, एएसपी विशाल खांबे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, कर्मचारी गजानन घायवट, कृष्णा देडे, गणेश बुजाडे, गणेश चेके, शिवाजी जमधडे, चालक प्रविण खंदारे यांनी केली.