नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. याबैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात नक्षलवाद्यांच्या मुद्द्यावर ही बैठक होत आहे. या बैठीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विज्ञान भवन येथे पोहोचले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या बैठकीला उपस्थित झाले आहेत.
उद्धव ठाकरे यापूर्वी ८ जूनला पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी त्यावेळी भेट घेतली होती. त्यांच्यासोबत त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते.