अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तासखेडा येथे ग्रा. प. उपसरपंच म्हणून वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच भागवत पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या वर्षा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच कल्पना पाटील या होत्या. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आधार धनगर यांनी सभेचे कामकाज पाहिले. निवडी प्रसंगी मावळते उपसरपंच भागवत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सीताराम पाटील, रुपचंद भील, मंगल पाटील, आशाबाई पाटील, पूनम पाटील तसेच माजी उपसरपंच संतोष पाटील, चिंधु पाटील, माजी सरपंच नाना ओंकार पाटील, अभिमन पाटील, दिलीप बहिरम, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, संगणक ऑपरेटर किशोर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.