जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातील (Rajasthan) नागोरच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षकाने १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोन वेळा बलात्कार केला. बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीने शिक्षणच सोडून दिलं. विद्यार्थिनीची लहान बहिणीसोबतही त्याच शिक्षकाने घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या काकांनी या प्रकरणात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पीडितेने सांगितलं की, 2018 मध्ये PTI (शारीरिक शिक्षक) हरिराम जाट (30) विद्यार्थिनीला रिकाम्या क्लास रूममध्ये घेऊन गेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडिता त्यावेळी 9 वीत शिकत होती. मुलीने सांगितलं की, बदनामीच्या भीतीने तिने कोणाला काहीच सांगितलं नाही. मात्र यामुळे शिक्षकाची हिम्मत वाढली. जेव्हा ती 10 वीच्या वर्गात आली त्यानंतर शिक्षक पुन्हा तिला एका रिकाम्या क्लासमध्ये घेऊन गेले आणि दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केला.
मुलीने सांगितलं की, त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. दहावीनंतर तिने पुढचं शिक्षण सोडून दिलं. पीडिताची लहान बहिण आता त्याच शाळेत 9 वीच्या वर्गात शिकते. तब्बल 8 दिवसांपूर्वी त्याच शिक्षकाने 16 वर्षांच्या लहान बहिणीसोबतही छेडछाड केली. त्याने लहान बहिणीसोबतही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा मोठ्या बहिणीला कळालं तर तिला धक्काच बसला आणि कुटुंबीयांना तीन वर्षांपूर्वी घडलेला प्रकार सांगितला. आता शिक्षकाला माफी मिळणार नसल्याचंही पीडितेने सांगितलं. शनिवारी रात्री पीडिता आपली आई आणि काकासोबत पोलीस ठाण्यात पोहोचली आणि गुन्हा दाखल केला. पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला. त्याशिवाय लहान बहिणीवर 5 मार्च रोजी आरोपी शिक्षकाने जबरदस्ती केल्याचीही घटना उघड केली.