जळगाव (प्रतिनिधी) भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून जळगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर शिक्षक आघाडी व ग्रंथालय सेलतर्फे शहरातील चांगले कार्य करणार्या ३३ शिक्षकांचा सत्कार तसेच १२ मुख्याध्यापकांचा शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सरस्वती मातेच्या फोटोला हार घालून व पुजा करुन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सदस्य आमदार माजी कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष ॲड. रविन्द्र पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस ईजाजभाई मलिक, महिला आघाडी जिल्हाध्याक्षा वंदनाताई चौधरी, मनोज गोविंदवार, सुमित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.