धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात महात्मा फुले हायस्कूल धरणगाव व नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव शाळेच्या शिक्षक बंधू – भगिनी यांनी गावात मोठा माळीवाडा परिसरात शाळाबाह्य बालकांच्या विशेष शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अशोकजी बिऱ्हाडे व केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार यांनी मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवायची आहे. या शोध मोहिमेच्या मुख्य हेतू शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, तसेच पत्रक भरणे. या मोहिमेत अठरा वर्षे वयोगटापर्यंतची दिव्यांग बालकांचाही समावेश करण्यात येत आहे. योग्य प्रमाणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालके शाळेत वयानुरूप दाखल झाली आहे. अशा बालकांना विशेष प्रशिक्षणात सहभागी करून घेणे. कोरोना काळात अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून सहा ते अठरा वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य असतील अशा सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे व ही मोहीम १ ते १० मार्च २०२१ पर्यंत चालु राहणार आहे. वस्ती, वाडा, पाडा वीटभट्टी, ऊसतोड, गुऱ्हाळघर गावस्तरावर, संपूर्ण शहरात करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षकांनी शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे. मोठा माळीवाडा परिसरातील रामलीला चौक, सावित्रीबाई फुले चौक, महात्मा फुले चौक, मोठा माळीवाडा समाज मढी, कलाल वाडा, बाजोट चौक, फुलहार गल्ली, जांजीबुवा गल्ली, ते बालाजी मंदीर या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे.
महात्मा फुले हायस्कूलच्या जेष्ठ शिक्षीका एम. के. कापडणे, हेमंत डी. माळी, व्ही. टी. माळी, सी. एम. भोळे, एस. व्ही. आढावे, एम. बी. मोरे, पी. डी. पाटील, व्ही. पी. वऱ्हाडे, एम. जे. महाजन, गोपाल महाजन, नूतन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, पवार या शिक्षकांकडून मोठा माळीवाडा परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.