धरणगाव (प्रतिनिधी) आपल्या देशाची अस्मिता असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिराची प्राणप्रतिष्ठा ज्या शुभ मुहूर्तावर झाली त्याच शुभमुहूर्ताचे औचित्य साधून गावकऱ्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली आहे. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीविठ्ठल रुक्मिणी हे प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात विराजमान आहेत. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे परिसरात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांच्या विश्वास आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर असून देवतांचा आदर्श आपण जीवन जगताना समोर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते टहाकळी येथे श्रीविठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पाटील हे होते. यावेळी किर्तनकार ह.भ.प. महाराज युकाराम महाराज चिंचोलकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.
अशोक पाटील यांच्या सहकार्याने गावात नव्यानेच श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर उभारण्यात आले. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अशोक पाटील व गावकऱ्यांतर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २२ जानेवारी या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. त्याच शुभमुहूर्ताचे औचित्य साधून गावकऱ्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. या ठिकाणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा पार पडली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण सर्व भाग्यवान आहोत की प्रभू श्रीराम यांचे प्राणप्रतिष्ठा आपल्या आपल्याला पाहायला व अनुभवायला मिळत आहे. आज संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होत आहे. या आनंदाच्या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. पुढील कित्येक वर्षांपर्यंत हा दिवस एक सुवर्णक्षण म्हणून आपल्या कायम लक्षात राहणार आहे. या संस्मरणीय दिवसाच्या आठवणी आनंददायी राहणार आहेत. त्याचबरोबर अशोक पाटील यांच्या सहकार्यांने प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी केली आहे. त्यांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. मंदिराला यापूर्वी 20 लाखाचे सभामंडप दिले असून पुढील टप्प्यात पुन्हा 30 लाखाचा निधी देण्यात येणार असून निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले. या मंदिरात आज अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधून श्रीविठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात करण्यात आली याचा आनंद होत आहे असे सांगितले.
गावासह मंदिर परिसर भगवामय
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते अशोक सदावर्ते यांनी केले. सूत्रसंचालन ह.भ.प.गोपाळ महाराज यांनी केले तर ग्रामस्थांच्या वतीने आभार सरपंच सविता कोळी यांनी मानले. गावात चुका चौकात काढलेल्या विविध रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण गावात भगवे झेंडे , पताका, बॅनर व स्वागत कमानीमुळे गावासह मंदिर परिसर भगवामय झाला होता.
यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी व्यासपीठावर अशोक पाटील, अशोक सदावर्ते, किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज. गोपाल महाराज, जितू महाराज, माजी उपसभापती सचिन पाटील, सरपंच सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर पाटील , माजी सरपंच दीपक चव्हाण , मंदिर उभारणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, यादव पाटील, प्रवीण पाटील अनिल पाटील, गोरख पाटील, काशिनाथ चौधरी, फुलपाट व दोनगाव येथील भजनी मंडळ आदी उपस्थित होते. तर संपूर्ण गावातील अबाल वृधांसह महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
पिंप्री येथे श्रीराम पालखी मिरवणुकीत पालकमंत्र्यांचा डीजेवर धरला ताल !
पिंप्री येथे श्रीराम ची पालखीची मिरवणूक काडण्यात आली. यावेळी याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले यावेळी श्रीराम भक्तांनी पालकमंत्र्यांना खांद्यावर घेतले असता ना. गुलाबराव पाटील यांनी आग्रहाखातर डीजेवर ताल धरत राम भक्तांचा उत्साह द्विगुणीत केला. तसेच झुरखेडा येथे पालकमंत्र्यांनी भेट देवून श्रीराम प्रतिमेचे दर्शन घेतले.