बोदवड:(प्रतिनिधी)- येथील न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय च्या मैदानावर दिनांक २८ रोजी सुरू झालेल्या हिवाळी क्रीडा शिबिरामध्ये १२० मुला-मुलींनी सहभाग नोंदविलेला होता त्यांना रोज वेगवेगळ्या खेळांचे मार्गदर्शन व सराव क्रीडा शिक्षका कडून सकाळी ७ ते १ च्या दरम्यान खेळांचा सराव घेतला जात होता, या हिवाळी क्रीडा शिबिराचा समारोप ,बोदवड शहरातील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभ ति र बरडिया मराठी शाळा येथील सभागृहामध्ये दि.८ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता. संस्थेचे चेअरमन माननीय श्री मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला ,त्याप्रसंगी प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव , विकास कोटेचा ,जेष्ठ संचालक, श्रीराम बडगुजर, रमेशजी जैन, , शाळेचे मुख्याध्यापक पी एम पाटील, ज्येष्ठ पत्रकार , महेंद्र पाटील, लोकमतचे पत्रकार श्री गोपाल व्यास, पत्रकार संदीप वैष्णव, तरुण भारतचे पत्रकार, नाना पाटील, पत्रकार सुहास बारी, दैनिक भास्कर व न्यूज चैनल चे पत्रकार जिया शेख पर्यवेक्षक श्री आर के तायडे, जे एन माळी ,उपप्राचार्य मीनाताई नेमाडे ,क्रीडा प्रमुख डॉ संजय निकम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी बोदवड शहरातील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय निकम यांनी हिवाळी क्रीडा शिबिरामध्ये दहा दिवसाच्या नियोजना संदर्भात माहिती देऊन संगणक व मोबाईल यापासून खेळाडूंना लांब ठेवून देशी व विदेशी खेळांकडे कसे आकर्षिले जावे यासाठीच खेळाचे आयोजन दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये केले जात असते ,त्यानंतर खेळाडू श्रीरंग पिहुल यांनी मनोगतनातून सुरुवातीच्या पहिल्या दिवशी वार्म आप आम्हाला कंटाळा वाटला मात्र सवय झाल्यामुळे आम्ही दहा दिवसांमध्ये अतिशय आनंदी वातावरणामध्ये विविध खेळांचे मार्गदर्शन घेऊन आनंद लुटला व या दहा दिवसांमध्ये क्रीडा शिक्षकांनी घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांचे आभार मानले, कुमारी प्रज्ञा भंगाळे सुद्धा दहा दिवसांमध्ये विविध खेळांमुळे आमचा शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्हाला नक्कीच याचा फायदा होईल हे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार महेंद्र पाटील यांनी संस्थेने राबवलेल्या उपक्रमाबद्दल संस्थेचे व क्रीडा विभागाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक हिवाळी क्रीडा शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास करावा व या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये घेतलेल्या अनुभवा वरती प्रकल्प तयार करून पत्रकार संघटनेकडे पाठवावा त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे जाहीर केले , शाळेचे मुख्याध्यापक पी एम पाटील सर यांनीही मनोगत व्यक्त केले दरवर्षी हिवाळी क्रीडा शिबिर राबवले जात असते आम्ही विविध उपक्रमांबरोबर शारीरिक आरोग्य मुलांचे चांगले राहावे याकरिता या हिवाळी क्रीडा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते व कबड्डी ,खो-खो, टेबल टेनिस, रस्सीखेच अशा विविध खेळांचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये केले जात असते, व संस्थेचे सदैव आम्हास सहकार्य लाभत असते ,प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव विकास भाऊ कोटेच्या यांनी संस्थेकडून मुलांसाठी जे ही सहकार्य व मदत लागेल ती दिली जाईल, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले शरीर अधिका अधिक तंदुरुस्त ठेवावे .लोकमतचे पत्रकार गोपाल व्यास यानी संस्थेने व क्रीडा विभागाने केलेल्या सत्कारा बद्दल आभार मानले व भविष्यामध्ये असे उपक्रम राबवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले, अध्यक्षीय मनोगत संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन शालेय स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले व क्रीडा शिक्षकांचे ही अभिनंदन केले, सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अतुल पाटील व बक्षीस वाचन एस के राणे सर व आभार श्री आर के तायडे सर यांनी मानले. या शिबिरातील सर्व १२० खेळाडुंचा गुणगौरव म्हणून सन्मान चिन्ह, मेडल, प्रमाणपत्र देऊन खेळाडूचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन यांनी खेळाडूंना अल्पोपहार दिला . हिवाळी क्रीडा शिबिर यशस्वी ते करिता क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय निकम , एन यु बागुल,एच आय परदेशी, जगदीश बडगुजर, भूषण भोई ,अजय बोरनारे, गिरीश खोडके, आनंद माळी,राम शर्मा, प्रेम वंजारी, सुमित मोपारी, अक्षय माळी,शिवा मिस्तरी,विजय चोपडे,मुरलीधर मिस्तरी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेत आहेत.