TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदार हाच माझा समाज तर विकास हेच माझे ध्येय ; पालकमंत्री गुलाबाराव पाटील यांचे दोनगाव येथे जाहीर सभेत प्रतिपादन !

दोनगाव, फुलपाट व टहाकळी येथे विविध विकास कामांचे ९ कोटींच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात विकासकामे करीत असतांना मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. केवळ मतांपुरते राजकारण कधीही केले नाही. आम्ही शब्द पाळणारे असून दोनगाव वासीयांच्या सत्काराने भारावलो आहे. कोणी पोष्टर फाडू शकता मात्र आमचे शास्वत काम कधी फाडू शकणार नाही. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोनगाव येथे आयोजित भव्य जाहीर सभेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मंगेश चव्हाण हे होते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
दोणगाव , टहाकळी व फुलपाट या गावातील सुमारे 9 कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात डोणगाव येथील पाळधी ते दोनगाव रस्ता मजबुतीकरण व विस्तारीकरण – 2.5 कोटी , दोनगाव ते कानळदा रस्ता डांबरीकरण – 1 कोटी, दोनगाव ते शेरी रस्ता डांबरीकरण – 1.10 कोटी, दोनगाव ते पथराड रस्ता डांबरीकरण – 30 लक्ष, दोनगाव ते खेडी रस्ता खडीकरण – 30 लक्ष, जि. प. प्राथमीक शाळा वॉल कंपाऊंड बांधकाम – 27 लक्ष, साठवन बंधारा बांधणे – 35 लक्ष , व्यायाम शाळा बांधकाम – 10 लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर दोनगाव बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 85 लक्ष , दोनगाव खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना – 49 लक्ष , संरक्षक भिंत बांधकाम -10 लक्ष , फुलपाट येथे पाणीपुरवठा योजनाचे भूमिपूजन – १७ लक्ष , पेव्हिंग ब्लॉक बसविणे व संरक्षक भिंत बांधकाम – 15 लक्ष , टहाकळी येथे पाणीपुरवठा योजना – 61 लक्ष , पेव्हिंग ब्लॉक बसविणे व साठवण बंधारा – 15 लक्ष अश्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

गुलाबभाऊंचा असाही सत्कार – पालकमंत्री भारावले ; सभेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

दोनगाव येथे ना. गुलाबाराव पाटील यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकाणीकाणी असंख्य महिलानी गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. जागोजागी स्वागत बॅनर लावण्यात आले होते., फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोषात व मोठ्या उत्साहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत दोनगावाच्या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या, मागासवर्गीय सेनेचे पदाधिकारी, एकलव्य सेनेचे पदाधिकारी, वि. का. सोसायटी, शिवसेना, युवासेना, ग्रामपंचायत पदाधिकारी, व ग्रामस्थांमार्फत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून जय भवानी- जय शिवराय , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद ! अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या स्वागतामुळे ना. गुलाबराव पाटील भारावून गेले. सभेला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

जीवाला जीव देणारा नेता म्हणजे गुलाबभाऊ – आ. मंगेश चव्हाण

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात जनतेच्या मनात राज्य करणारा व जीवाला जीव देणारा नेता म्हणजे गुलाबभाऊ आहे. त्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी दोनगावकरांनी गुलाबभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे असे प्रतिपादन दुध संघाचे चेअरमन व आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, दोणगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावाना जोडणाऱ्या पुलाच्या कामाला तसेच श्री महादेव मंदिरालगत सामाजिक सभागृहाचे कामाला लवकरच मंजुरी दिली जाईल. परिसरातील शेत रस्त्यांची कामे एप्रिल नंतर प्राधान्याने हाती घेण्यात येतील

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर.डी. पाटील व के.आर. पाटील यांचा ग्राम रत्न पुरस्काराने सन्मानित

दोन गाव येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात निस्पृह सेवा देणारे सामजिक जेष्ठ कार्यकर्ते आर.डी. पाटील व के. आर पाटील यांचा गावा मार्फत “ ग्रामरत्न ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिल्ड , प्रमाणपत्र , शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आर. डी. पाटील व के आर पाटील यांचे कौतुक करून गाव विकासासाठी आर. डी. पाटील व के. आर. पाटील यांच्या सारख्या जेष्ठांची गरज असल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर आ.मंगेश चव्हाण , जिल्हा बँक व दुध फेडरेशन चे संचालक राष्ट्रवादीचे संजय पाटील, जेष्ठ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आर. डी .पाटील, के आर पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर , तालुकाप्रमुख गजानन पाटील , राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्कीदादा पाटील, पं. स. सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, रविंद्र चव्हाण सर, फुलपाट सरपंच हरिभाऊ पाटील, उपसरपंच दत्तू पाटील, भिकन पाटील, किरण पाटील सुनील पाटील, टहाकळीचे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच किरण पाटील , मधु पाटील, अशोक पाटील, बंडू पाटील, प्रमोद पाटील, डी. ओ. पाटील, धरणगावचे पप्पू भावे , विलास महाजन, भटू पाटील, सोसायटी चेअरमन किशोर पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, महिला संपर्क प्रमुख सरिताताई माळी- कोल्हे , प्रिया इंगळे, भारती ताई चौधरी, पुष्पा ताई पाटील, सुधाकर पाटील , गोकुळ लंके , डॉ. कमलाकर पाटील, जनाआप्पा कोळी, चेतन पाटील, शरद पाटील, पंकज पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, वि. का. सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन भास्कर पाटील सर यांनी केले. तर आभार विका सोसायटीचे माजी चेअरमन किशोर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी सांगितले की, दोनगावच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला असून गुलाबभाऊंच्या पाठीशी दोनगाव व परिसरातील जनता खंबीरपणे उभी असल्याचे सांगत कार्यक्रमाची सविस्तर माहिती विषद केली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन किशोर राघो पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, माजी सरपंच तुकाराम पाटील, कैलास पाटील, वि.का.चे चेअरमन सदाशिव पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी आयोजन केले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक माजी वि. का.सोसायटीचे चेअरमन किशोर राघो पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, कैलास पाटील, वि.का.चे चेअरमन सदाशिव पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना , युवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

दररोज ९५ रुपये वाचवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा १४ लाखांचा परतावा ; पोस्टाची 'ही' भन्नाट तुम्हाला माहितीय का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल येथील शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ

November 12, 2021

आईच्या डोळ्यांदेखत चाकूने सपासप वार करत केला बापाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 7, 2023

गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला !

July 10, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९२१ कोरोनाबाधित, ५०४ झाले बरे !

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group