भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव आयशरने रिक्षाला धडक दिल्याने भुसावळ येथील दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ घडली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहिती, मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात अपघात प्रमिला नारायण पवार (वय-६०) व तनिष्का नरेश पवार (वय-०१) यांचा जागीच मृत्यू झाला असून हे एकाच घरातले होते. तर नारायण पवार (वय माहित नाही) शितल नरेश पवार (वय २४), वेदिका नरेश पवार (वय ४) व चालक जितेंद्र नाना देशमुख हे जखमी झाले आहेत.
भुसावळ येथून अॅपे रिक्षाने मध्यप्रदेश राज्यातील ठिकरी (ता. सेंधवा) येथे जात होते. दरम्यान, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड या गावाजवळ मध्यप्रदेश कडेच जाणार्या एम.एच.१८ एम. ५५१० क्रमांकाच्या आयशर गाडीने त्यांच्या अॅपे रिक्षाला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. हा अपघात हाडाखेड गावाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
















