भुसावळ (प्रतिनिधी) आज शहरातील खडका चौफुली येथे झालेल्या भीषण अपघात दाम्पत्य ठार झाले आहे. हे दाम्पत्य बुलढाणा येथून लग्नासाठी भुसावळला आले होते.
आज सकळी ८.३० वाजता खडका चौफुलीनजीक झालेल्या अपघातात चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय-६५), संध्याबाई चंद्रकांत वराडे (वय-५५, दोघं रा.बुलढाणा) ते प्रोफेसर कॉलनीतील गडकरी नगरमध्ये लग्नानिमित्त येत असतांना खडका चौफुलीजवळ हायवेवरून येणाऱ्या डंपरने त्यांना उडवले. त्यात पती व पत्नी जागीच ठार झाले. नातेवाईकाच्या लग्नासाठी ते भुसावळात आले होते.