TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवऱ्याचा खून करण्यासाठी बायकोने दिली २ लाखाची सुपारी ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

पत्नीसह पाच जण अटकेत ; संशयित आरोपींमध्ये जळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश !

vijay waghmare by vijay waghmare
May 6, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) हडको, एन-११ येथील एसबीओए शाळेजवळ गणेश दराखे या मजुराचा शनिवारी (दि.४) गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बायकोनेच प्रियकराच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील पहुर कसबे येथील तिघांना दोन लाखांची सुपारी देत खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रुपाली गणेश दराखे (पत्नी, रा. नवजीवन कॉलनी, एन ११), सुपडू सोनू गायकवाड (प्रियकर, ३५, रा. कुऱ्हाड, ता.पाचोरा), अमोल चिंतामण चौधरी (३३), अजय दिलीप हिवाळे (२५), अनिकेत कडुबा चौथे (२४) (मजुरी, तिघेही रा. पहुर कसबे, ता.जामनेर) यांना अटक केली. पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

गणेश हा मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. ४ मेरोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करून त्याला जीवे ठार केले. त्याच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. हा प्रकार एन ११ हडको येथे घडला. मारेकऱ्यापासून बचावासाठी तो गल्लीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलकडे पळाला व नंतर जॉगिंग ट्रॅकवर कोसळला. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा संयुक्त तपास करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक माहिती गोळा केली असता, गणेशची बायको रुपालीवर त्यांचा संशय बळावला. तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने खुनाची कबुली दिली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

जॉइंट अकाऊंटवरून दोन लाख काढले !
गणेशने हडको एन-११ भागात दोन रूमचा ब्लॉक भाड्याने घेतला. दोन महिन्यांपूर्वी रूपाली व गणेश एकत्र राहायला लागले. गावाकडे रूपाली ब्युटीपार्लर चालवीत होती. त्यामुळे तिने इकडे आल्यावर घरीच पार्लर सुरू केले. जॉइंट अकाऊंटवरील संपूर्ण पैसा हा रूपालीला एकटीला हवा होता. त्यामुळे तिने प्रियकराला पती गणेशचा काटा काढण्यासाठी तगादा लावला. रूपालीने जॉइंट अकाऊंटवर आलेल्या आठ लाखांपैकी दोन लाख रुपये ब्युटीपार्लरचे साहित्य घेण्यासाठी मागितले. गणेश त्यासाठी तयार झाला.

दोन लाखांत सुपारी दिली !
रूपालीने ते दोन लाख रुपये काढून प्रियकर सुपडू गायकवाड याच्याकडे दिले. जेसीबीचालकांना दिली सुपारी सुपडू गायकवाड हा कुऱ्हाड (ता. पाचोरा, जि. जळगाव) या गावात राहतो. तेथे जेसीबीचालक म्हणून तो काम करतो. सुपडूने दीड महिन्यात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी संपर्क साधला. जेसीबीचालक मित्र अमोल चिंतामण चौधरी याने सुपडूकडून दोन लाखांत सुपारी घेतली. अमोलने गेल्या दीड महिन्यात गणेश कुठे राहतो?, तो कधी कधी घराबाहेर पडतो?, कधी घरी येतो?, याची रेकी केली.

पहाटे दोन वाजता निघाले पहूरहून !
४ मे रोजी पहाटे दोन वाजता अमोल चौधरी, अजय हिवाळे आणि अनिकेत चौथे हे तिघे धारदार शस्त्र घेऊन पहूर (जि. जळगाव) येथून निघाले. साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास ते एन-११ भागात पोहोचले. पहाटे घरातून डबा घेऊन कामावर निघालेल्या गणेशची ते तिघे वाटच बघत होते. गणेश दिसताच तिघांनीही त्याच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण करत धारदार शस्त्राने मानेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला सोडून तिघेही दुचाकीवरून पुन्हा पहूर येथे पळून गेले. त्या दिवशी हे आरोपी आपापल्या जेसीबी, ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामावर हजर राहिले.

पोलीस चौकशीत अडकली रूपाली !
पाच वर्षांपासून रूपाली व गणेश सोबत राहत नव्हते. त्यानंतर अचानक रूपालीने नांदायला होकार दिला. आज नवऱ्याचा खून होणार आहे, हे माहिती असतानाही चेहऱ्यावर चौकशीत काहीच माहिती नाही, असे हावभाव आणले. नवरा मृत झाल्याचे समजल्यावर डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही बाहेर पडत नव्हता. यावरून तिचा खुनात हात असल्याचा संशय पोलिसांना आला. अधिक चौकशी केली असता रूपालीने प्रियकर सुपडूच्या मदतीने गणेशचा खून केल्याची कबुली दिली. त्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे सांगितले.

दीड महिन्यापासून खुनाचे प्लॅनिंग !
रुपाली आणि गणेश हे गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत होते. मात्र, गणेशच्या दोन मजली घराचा सौदा झाला होता. यातून त्याला २१ लाख रुपये येणार होते. त्यामुळे गणेशने नातेवाइकांच्या मदतीने रूपालीशी संपर्क साधून पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. इकडे या पाच वर्षांत रूपालीचे नात्यातील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, नवऱ्याला घर विक्रीतून येणारा पैसा बघून रुपालीने एकत्र राहण्याच्या निर्णयाला होकार दिला. गणेशचा खून केला तर आपल्याकडे पैसेही राहतील आणि दोघांच्या प्रेमात कोणी अडसरही ठरणार नाही, असा प्लॅन त्यांनी आखला होता.

यांनी तपासात बजावली महत्वाची भूमिका !
निरीक्षक संदीप गुरमे, निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, नितीन कामे, योगेश गायकवाड, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, प्रमोद देवकते, संजय नंद, विजय निकम, चंद्रकांत गवळी, परभत म्हस्के, जितेंद्र ठाकूर, विजय भानुसे, मनोहर गिते, नितीन देशमुख, संतोष भानुसे, रवींद्र खरात, अजय दहिवाल, सिडको पोलीस ठाण्यातील सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, लाला पठाण, विशाल सोनवणे, संतोष चौरे आदींनी तपासात महत्वाची भूमिका बजावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChhatrapati sambhaji NagarCrime

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

...तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत याचे मतदारांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव पिता-पुत्र मृत्यू प्रकरण : पोलिसांनी केला मयत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

August 14, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव दौऱ्यावर ; युवा संमेलनात युवकांशी साधणार संवाद !

February 11, 2024

ड्रॅगन फ्लाय नाईट क्लबवर पोलिसांची धाड; सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटिंवर गुन्हा दाखल

December 22, 2020

भुसावळात शिस्तप्रिय आयपीएस अधिकारीऱ्याची नेमणूक करा ; नागरिकांची मागणी

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group