पुणे (प्रतिनिधी) पुण्यातील कात्रज –देहुरोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघात एकाचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. तर अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
एका माल ट्रकने अनेक गाड्यासह तीन दुचाकींना उडवले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे.