धरणगाव (प्रतिनिधी) येथील गारखेडारोडवरील पालिकेच्या कचरा डेपोला काल रात्रीपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. साधारण २२ ते २३ बंब वापरूनही आग अद्याप आटोक्यात आलेली नाहीय.
गारखेडारोडवरील पालिकेच्या कचरा डेपोला काल (बुधवार) रात्री आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या बंबाने मदतीने आज सकाळपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतू सायंकाळ ५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. आग आटोक्यात आणण्यासाठी एरंडोल ६-७ तर धरणगावचे १० १५ वापरण्यात आलेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निलेश वाणी, अरुण पाटील, रविकांत वाघमारे, महेश माळी, महेश चौधरी, सचिन जिने, गोपाल चौधरी तर एरंडोल पालिकेचे किरण पाटील, प्रकाश गायकवाड हे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला होता.