पुणे (वृत्तसंस्था) टीईटी, म्हाडा (TET And MHADA) परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी अटकेत असेलल्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट या आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
टीईटी आणि म्हाडा परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे पाचही आरोपी अटकेत असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. तसेच पाचही जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचीही माहिती मिळतेय.
काही दिवसांपूर्वी टीईटी आणि म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केला होता. पण, यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर आले होते. राज्य सरकारने कसून चौकशी केली असता याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.