औरंगाबाद (वृत्तसंस्था) ‘नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवर मी आणखी प्रतिक्रिया देणार नाही. खरं तर त्याच्या टीकेवर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण, कारण, त्यात दखल घेण्यासारखं आहेच नाही, असे मला वाटते, ‘असे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या सर्व भानगडी बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पण त्या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारण्यात आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं त्यांना शिवसेनेबद्दल अधिक माहीत असेल. त्यांना शिवसैनिकच उत्तर देतील.
मला राणेंच्या टीकेवर अधिक वक्तव्य करण्याची गरज वाटत नाही,’ असं चव्हाण म्हणाले. राणेंच्या टीकेवर शिवसेनेकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हेही काही बोललेले नाहीत, हे निदर्शनास आणले असता चव्हाण म्हणाले, ‘प्रतिक्रिया देण्यासारखं त्यात काही नाही. मुळात राणेंनी केलेली टीका दखल घेण्याइतपत नाही.’ उद्धव ठाकरे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं. मी ते दिलं, असंही राणे कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, ‘मी राणेंनी दिलेलं आरक्षण का टिकलं नाही,’ असा प्रतिप्रश्न चव्हाण यांनी केला.