ब्रिटन (वृत्तसंस्था) भारतात कुणाला पहिली कोरोना लस मिळणार याची प्रतीक्षा आहेच. मात्र, ब्रिटनमध्ये एका ९० वर्षांच्या आजींनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीचे आपात्कालीन वापर सुरू करण्यात आला आहे.
ब्रिटनने फायझर-बायोएनटेक लसीला वापराला मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरण सुरु झालं आहे. लसीकरणाची सुरुवात ९० वर्षांच्या मार्गारेट किनान यांना देऊन करण्यात आली आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. माहितीनुसार यूकेमध्ये ८० वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसह आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. यूएसमधील फायझर आणि जपानमधील बायोटेएनटेकनं ही लस विकसित केली आहे. ही लस ९५% प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालावरून लसीची सुरक्षितता सांगण्यात आली. हा अहवाल जारी होताच फक्त २३ दिवसांच यूकेनं आपात्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सीनं या लशीला मंजुरी दिली आहे. कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे.