जळगाव (प्रतिनिधी) ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याकरीता एका ग्रुपच्या माध्यमातून लिंक पाठवली. तसेच त्यामध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळवून देतो असे सांगत भागवत किसन पाटील (वय ६१, रा. गणेश पार्क, आशाबाबा नगर) यांची ५ लाख १४ हजारात ऑनलाईन गंडविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर दि. ८ रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आशाबाबा नगरजवळील गणेश पार्कमध्ये भागवत पाटील हे वास्तव्यास आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी त्यांना अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याकरीता एका ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर त्या गृपच्या माध्यमातून दोन लिंक पाठवून त्या डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी मोबाईलमध्ये पाठविलेले वेबपेज डाऊनलोड करुन ते शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळवून देतो असे सांगीतले. दरम्यान, भागवत पाटील यांच्या बँक खात्यातून संशयितांनी ५ लाख १४ हजार परस्पर काढून घेतले. त्यांना हे समजण्यानंतर लगेच ते सायबर पोलिसात गेले. याप्रकरणी आता सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















