TheClearNews.Com
Friday, December 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनीधी) स्थानिक कलावंतांचे मंगल पवित्र सुरातील शिवतांडव सोत्र, संतुर वादन आणी दुसऱ्या सत्रात कथ्थक भरत नाट्यम् यांच्या जुगलबंदीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात झाली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती महोत्सवाची सुरवात जळगावच्या कलाकारांच्या शिवतांडवाने झाली. ४० कलावंताच्या शिवतांडव उदयोस्तू जयजयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या सोहळ्याचा आरंभ थाटामाटात झाला. नपूर चांदोरकर-खटावकर, कोमल चौव्हाण, हिमानी पिले,दिपीका घैसास यांनी शिवतांडव नृत्य सादर करून दाद मिळवली. यावेळी प्रेक्षकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

READ ALSO

बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

यानंतर मुख्य सांगितीक कार्यक्रमाची सुरवात झाली. कोलकाताचे पं. संदीप चॕटर्जी यांच्या सुंदरवादनाने रसिक मंत्रमृग्ध झाले. सुरवात आलप जोड व झाला ने संदिप घोष यांनी केली. मध्यलयीत रूपक तालात निबध्द राग किरवाणी सादर केला. त्यानंतर द्रृत तीन ताला तील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली व जळगावकर रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. त्यांना तबल्यावर कोलकाताचे प्रसिद्ध तबलावादक संदिप घोष यांनी साथ केली. तर दुसऱ्या सत्रात अहमदाबादच्या मानसी मोदी व मानसी करानी यांची कथ्थक व भरत नाट्यम् ची जुगलबंदी कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भरत नाट्यम् व कथ्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्याचे दोन प्रवाह असून ते आज कलेच्या महासागरात व विलिन झाले. या जुगलबंदिला म्हणूनच ‘संगम’ असे सार्थ शिर्षक मानसी द्वियींनी दिले.

भरत नाट्यम मध्ये पुष्पांजली म्हणजेच फुले असलेले अर्पण यात कथ्थक मधील जटील पद्न्यास आणि चक्रांसह भरत नाटम् मधील जथ्यांसह जटील पद्न्यास यास संगीताशी समक्रमित केले. त्यानंतर प्रसिध्द बालगंधर्व सिनेमातील प्रसिध्द गित ‘मन मंदिरा सादर’ केली. एकल कथक नृत्यात नृत्त समन्वय सादर केला. तर एकल भरत नाट्यम् मध्ये पदमवर आधारित राधा व कृष्ण हे नृत्य सादर केली व शेवटी संत मिराबाई यांचे ‘बरस बरसे बदरिया’ सादर केली. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजीत स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वनाने औपचारिक उद्घाटन झाले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतिष कुलकर्णी, नागपूरचे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक शशांक दंडे, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी,स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक संजय गुप्ता, युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मनोजकुमार, एलआयसीचे शाखा प्रबंधक चंद्रशेखर आगरकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ.विवेकानंद कुलकर्णी, दिपक चांदोरकर, दिपीका चांदोरकर, अरविंद देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्यावतीने चंद्रशेखर आगरकर यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. दोघंही सत्राच्या कलावंतांचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दिपक चांदोरक यांनी गणेशवंदना सादर केली. दिप्ती भागवत यांच्या सुरेख सुत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली.

आज मर्म बंधातली ठेव ही

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे उद्या दि.७ रोजी ‘मर्म बंधातली ठेव..’ हा नाट्य संगीताचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सादरकर्ते श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक आहेत

श्रीरंग भावे – प्रख्यात गायिका सरिता भावे त्याचप्रमाणे प्रख्यात शास्त्रीय व्हायोलिन वादक व संस्कृतचे स्कॉलर पं. राजेंद्र भावे यांचे चिरंजीव असलेले श्रीरंग भावे यांनी आपलं शास्त्रीय संगीताचं शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गुरु डॉक्टर पं. राम देशपांडे तसेच सुगम संगीताचं शिक्षण मातोश्री सौ सरिता भावे यांच्याकडे घेतलं. त्याच प्रमाणे नाट्यसंगीताचे शिक्षण पं. रामदास कामत, रजनी जोशी, अरविंद पिळगावकर, आणि शरद जांभेकर यांच्याकडून घेतले. श्रीरंग आकाशवाणीचा व दूरदर्शनचा मान्यता प्राप्त कलावंत आहेत. श्रीरंगला आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये तीन महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यामध्ये बालगंधर्व पुरस्कार, पं. वसंतराव देशपांडे पुरस्कार, स्वरराज पं. छोटा गंधर्व पुरस्कार. झी मराठीच्या सारेगमप या रियालिटी शो च्या १० व्या सीजन साठी श्रीरंग ने अंतिम फेरी पर्यंत बाजी मारली होती. बालगंधर्व कट्यार काळजात घुसली व पानिपत या चित्रपटांसाठी श्रीरंगने पार्श्वगायन केले आहे. झी मराठीच्या “आम्ही सारे खवय्ये” व “मेजवानी परिपूर्ण किचन” तसेच कलर्स मराठी या वाहिनीवर “आज काय स्पेशल” या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी म्युझिशियन शेफ या भूमिकेतून आपला सहभाग नोंदविला आहे. गायन ऐकण्याची संधी जळगावकरांना आहे.

धनंजय म्हसकर – धनंजय चे शास्त्रीय गायनाचे सुमारे १५ वर्ष शिक्षण पहिल्या गुरू सौ. मोनिका पोतदार यांच्याकडे झाले. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात मुंबई विद्यापिठातून एम.ए. करत असताना डॅा. शोभा अभ्यंकर आणि नरेंद्र कोथंबीकर, हेमांग मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे मेवाती घराण्याचे शिक्षण चालू आहे. त्याचप्रमाणे नाट्यसंगीताचे मार्गदर्शन जेष्ठ गायक-नट रामदास कामत यांच्याकडून घेत आहे व सुगम संगीताचे मार्गदर्शन संगीतकार अच्युत ठाकूर यांच्याकडून मिळाले. धनंजय ला खुल्या राष्ट्रीय युवक महोत्सव, पटना येथे झालेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक मिळाला. “शुक्रतारा” मध्ये जेष्ठ गायक अरूण दाते यांच्याबरोबरच प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर, गायक- संगीतकार श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल, अनुराधा मराठे यांच्याबरोबर गायनाचे अनेक कार्यक्रम धनंजय ने सादर केले आहेत. बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली या दोन्ही चित्रपटांसाठी कोरस गायन. १८ प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे निर्मित “सुबक “ अंतर्गत व्यंकटेश माडगुळकर लिखित “ पती गेले गं काठेवाडी “ नाटकात सूत्रधाराची भूमिका. ऑल इंडिया रिडिओ च्या सांगितीक मालिकेत जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायनाची संधी धनंजयला मिळाली आहे. “रंग उषेचे” या कार्यक्रमात जेष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि जेष्ठ गायक संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबर गायनाची संधी. सध्या ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेल्या “Bandish Bandit” या सांगितिक वेब सिरीज साठी प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्या मार्गदर्शनाखाली पार्श्वगायन.

वेदश्री ओक – एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठांमधून वेदश्रीने संगीतात एमए केले असून त्या सुवर्ण पदक विजेत्या आहेत. सुमारें दहा वर्षांपासून त्या संगीत शिक्षक म्हणून सेवाव्रत असून त्यांनी अनेक शाळांचे वेगवेगळे कार्यक्रम बसवले आहेत त्याचबरोबर त्यांनी संगीत विषयक अभ्यासक्रम सुद्धा तयार केला आहे. ठाण्याच्या श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल येथे त्या संगीत शिक्षक व संगीत विभागाच्या प्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सेवाव्रत आहेत. उत्तुंग सांस्कृतिक परिवार मुंबई या संस्थेच्या त्या विश्वस्त असून उत्तुंग संस्थेने सुमारे ४०० कार्यक्रम २००० कलाकारांच्या साह्याने आत्तापर्यंत सादर केले आहेत. आशा खाडिलकर अकॅडमी फोर परफॉर्मिंग आर्ट्स, ठाणे या संस्थेच्या त्या संचालक असून विविध प्रकारचे सांगीतिक शिक्षण अर्थात शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, भक्तीसंगीत, इ. प्रकारचे गायन त्या शिकवतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

December 11, 2025
जळगाव

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

December 11, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

December 11, 2025
धरणगाव

जागतिक एड्स दिन पंधरवडा : धरणगाव येथे जनजागृती व तपासणी अभियान संपन्न

December 10, 2025
गुन्हे

लाच मागताना सरपंचासह शिपाई जेरबंद !

December 10, 2025
Next Post

हे तुम्हाला माहीतीये का?...'या' माजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी SPG कमांडोने झाडली होती गोळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाऊसो गुलाबराव फौंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात पालक विद्यार्थी भारावले !

July 21, 2024

पारोळ्याजवळ दुभाजकावर कार आदळली ; गुजरातच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी !

November 22, 2023

“… तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती” : शिवसेना

April 26, 2021

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात सवित्रीबाईं फुले यांची १९३ वी जयंती साजरी ..

January 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group