जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल चालक, व्यवस्थापक व त्यांना मदत करणारा अशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या हॉटेलमधून बांगलादेशी तरुणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तर नीलेश राजेंद्र गुजर, चेतन वसंत माळी, विजय सखाराम तायडे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशी तरुणीसह अन्याय एका महिलाला पोलिसांनी आशादीप वस्तीगृहात रवाना केले आहे. बांगलादेशी तरुणी ही ढाका येथील रहिवासी असून तिच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारे अधिकृत पासपोर्ट व व्हिजासह इतर कोणतेही कागदपत्र नसल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.