TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांच्या जन्म शताब्दीला उत्साहात प्रारंभ !

विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या चले जाव चळवळीत सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा शहरातील प्रख्यात गुळाचे व्यापारी मोहनलाल छोटालाल गुजराथी (वय-९९) यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुजराथी वाडीत आयोजित छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याला विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात प्रारंभ करण्यात आला.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांना स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आणि जन्मशताब्दी निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

शहरातील गुजराथी गल्लीतील स्व.छोटालाल वेडूसा गुजराथी यांच्या सामाजिक व देशप्रेमाने ओटीपोत भरलेल्या कुटुंबात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहनलाल गुजराथी यांचा दि.१५ नोव्हेंबर १९२४ रोजी जन्म झाला.इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीत गुजराथी गल्लीत स्व.स्वातंत्र्य सैनिक छोटालाल गुजराथी यांच्या कुटुंबात देशातील अनेक काँग्रेस नेत्यांचा राबता असल्याने मोहनलाल गुजराथी यांना बालपणीच संस्कारा बरोबर भारत पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचे बाळकडू मिळाले.वडील स्व. छोटालाल वेडूसा गुजराथी व आई स्व.गोपीबाई यांच्याकडून देशप्रेमाचा वारसा मिळाला होता. मंतरलेल्या दिवसात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. साने गुरुजी शहरात आले असता इंग्रज सरकारने त्यांना दिसता क्षणी पकडण्याचे आदेश काढले होते म्हणून सानेगुरुजी चोपड्यात भूमिगत झाले. त्यांना चोरवाटेने अमळनेरला सोडायला जातांना ऑगस्ट १९४२ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी अटक करण्यात येऊन धुळे जिल्हा कारागृहात ६ महिने जेलमध्ये ठेवले होते.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांचे वडील स्वर्गीय छोटलाल गुजराथी यांनी १९३० मध्ये स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकार विरुध्द अंदोलन केल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास झाला होता.तसेच आई स्वर्गीय गोपीबाई गुजराथी यांनी स्वातंत्र्य आंदोलनात १९४२ च्या चळवळीत चोपडा तहसील कचेरीवर तिरंगा फडकावल्याने त्यांना अटक करण्यात येऊन धुळे कारागृहात ठेवण्यात आले होते.स्वर्गीय छोटलाल गुजराथी यांनी १९३६ मध्ये फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात योगदान देत विविध जबाबदारी पार पडली.तसेच त्यांनी व्यापारात नावलौकिक प्राप्त केला होता.देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन गौरविण्यात आले होते.चोपडा कसबे सोसायटीचे चेअरमन प्रवीण विठ्ठलदास गुजराथी यांचे ते मामा होत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेऊ शकतात का?, जाणून घ्या, मोटार वाहन कायदा !

December 5, 2021

गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोन जणांना अटक

January 7, 2022

मोठी बातमी : उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनावर होणार शपथविधी?

August 8, 2022

चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे रजिस्ट्रेशन अभावी रखडला अनेकांचा दुसरा डोस !

December 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group