एरंडोल (प्रतिनिधी) येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, कुंझरकर हे पहाटे साडेतीन वाजेच्या घरातून निघाले होते. तसेच मंगळवारी सायंकाळी भुसावळ येथे एका कार्यक्रमात गेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. मंगळवारी ते गालापूर येथील शाळेत गेले. त्यानंतर भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. घरी परतल्यानंतर पहाटे कुणालाही न सांगता ते घरातून निघाले. दरम्यान, आज पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहे. तसेच किशोर पाटील हे संघटनेशी निगडीत होते., कुंझरकर यांच्या अंगातील डाव्या बाजूचा बनियानचा भाग फाटलेला आहे. तसेच त्यांच्या डोक्याला देखील मार लागलेला आहे. एवढेच नव्हे तर घटनास्थळी त्यांची मोटारसायकल देखील नाहीय. पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली असून कुंझरकर यांच्या मोबाईलचा सीडीआरवर लक्ष केंद्रित केले आहे.