धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील धरणगाव महाविद्यालया समोरील बस स्टॉपच्या शेडमध्ये आज सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणगाव महाविद्यालया समोरील बस स्टॉपच्या शेडमध्ये एक अनोळखी पडून असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते. दरम्यान, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मयत व्यक्ती तिथं कसा आला?, त्याचा मृत्यू कसा झाला?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीय.