भुसावळ (प्रतिनिधी) येथील तापी नदी काठावर स्मशानभूमी आहे. शहरातील नागरिक अंतविधीसाठी याठिकाणी येतात. दिवसा अंतविधीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडतो. मात्र, रात्री अंतविधी करण्यासाठी नगरपरिषदेने या ठिकाणी लाईटांची व्यवस्था केलेली आहे. आठवड्या भरापासून रात्रीच्या अंधारात अंतविधी करण्यासाठी स्मशानभूमीत लावण्यात आलेली हायमस लॅम्पची बत्ती गुल झाल्याने स्मशानभूमी पुन्हा अंधाऱ्यात असल्याने नागरिकांना अंतविधीसाठी अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. रस्त्यांमुळे शहरातील नागरिकांना अनेक आजार सुरू झाले आहेत.काही प्रमाणात रस्ते असलेल्या ठिकाणी अमृत योजनेने विकास कामांच्या नावाखाली भर टाकून भुसावळ शहराला भकास शहर बनविल्याने रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे.अवजड वाहनांच्या रहदारीमुळे उडणारी धूळ ही मोटरसायकल चालकांना अपघातांचे निमंत्रण देत आहे.
तर दुसरीकडे शेवटची अंतिम यात्रा करणाऱ्याला जिवंतपणी तर नगरपरिषदेचे विकास कामे दिसली नाही पण शेवटच्या यात्रीला ही नगरपरिषदेच्या कामचुकार पणामुळे स्मशान भूमी मध्ये जातांना अंधाऱ्यातच शेवटचा प्रवास नगरपरिषदेच्या हलगर्जी पणामुळे करण्याची वेळ आलेली आहे.स्मशान भूमीकडे नगरपरिषदेने लक्ष देऊन अंधाऱ्यात असलेल्या स्मशानभूमी वरील बंद लाईट त्वरित सुरू करावी जेणे करून शहरातील नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंतविधी करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.