फत्तेपूर ता.जामनेर (प्रतिनिधी) घरात एकटीच राहत असलेलया राधाबाई भालचंद्र परदेशी या वृद्धेचा मृतदेह शनिवारी जखमी अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे फिरवित आरोपी सुभाष परदेशी या घटनेचा उलगडा केला असून वृद्धेच्या मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी (वय ६५) याने पेन्शच्या पेशांसाठी आपल्या आईचा खून केला. तसेच तीच्या अंगावरील दागिने ओरबडून घेवून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपसात उघड झाली आहे.
कानातील दागिने ओरबडून नेल्याच्या होत्या जखमा !
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील राहेरा रस्त्यावर राधाबाई परदेशी या वृद्ध महिला एकट्यात राहत होत्या. शनिवारी वृद्ध महिलेचा मृतदेह घरातच मिळून आला होता यावेळी वृद्धेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या तर कानातील दागिने ओरबडून नेल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे दागिन्यांसाठी वृद्धेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी फत्तेपुर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून तीव्र रोष व्यक्त केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी खात्री दिली होती.
एलसीबीच्या पथकाने उलगडला !
खूनाचा गुन्हा घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यांनी तपासचक्रे फिरवित पाच दिवसानंतर त्यांनी वृद्धेच्या खूनाचा उलगडा केला. यावेळी वृद्धेचा मुलगा सुभाष परदेशी यानेच आईकडे असलेल्या पेन्शच्या पैशांसाठी खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
पेन्शनच्या रक्कमेने केला वृद्धेचा घात !
पोलिसांनी संशयित सुभाष परदेशी यांची चौकशी केल्यानंतर त्याने वडील शिक्षक होते. त्यांच्या निधनानंतर आईला पेन्शन मिळत होती. प्रत्येक वेळी पेन्शनची रक्कम काढण्यासाठी सुभाष परदेशी हे त्यांच्यासोबत बँकेत जात होते. त्यातील मोजकीच रक्कम आईला देऊन उर्वरित पैसा स्वतःकडे ठेवत होते. मात्र पेन्शनची रक्कम काढण्याचा निर्णय आईने स्वतःच घेतल्यामुळे सुभाष यांना त्यांच्या आईचा राग आला होता. हाच राग मनात धरुन ठेवत त्यांनी आईला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.
संशयास्पद वर्तवणुकीमुळे अडकला जाळ्यात !
एलसीबीचे पथकाने घटनास्थळावरील अनेक संशयितांची चौकशी केली. परंतु त्यांना कुठलाही पुरावा मिळत नसल्याने तपासाची दिशा देखील मिळत नव्हती. अखेर पथकाने संशयित सुभाष परदेशी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत होता तसेच त्याची वर्तवणुक संशयास्पद असल्याने पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला.
या पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसन नजन पाटील, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकों लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, महेश सोमवंशी, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश फड, उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्या पथकाने केली.