मुंबई (वृत्तसंस्था) महिला अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक प्रथमच जाहीररीत्या बाहेर पडले. माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर गणेश नाईक पुन्हा एकदा समोर आले आहेत. बुधवारी त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबईतील अडचणींविषयी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील आरोपांवर भाष्य केलं.
“माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे हे विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे. याबाबत आपण लवकरच सविस्तर बोलणार असून दूध का दूध आणि पानी का पानी करणार आहेत,” असं गणेश नाईक म्हणाले आहेत. “गेल्या २५ वर्षात ज्यांना राजकारणात, समाजकरणात उद्धिष्ट साध्य करता आले नाही त्यांनी अन्यायकारक पद्धतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. हायकोर्टाने मला दिलासा दिला आहे. मोकळीक देताना कोर्टाने काही बंधनं घातली आहेत. त्यामुळे गरज लागेल त्या स्तरावर योग्य पद्धतीने मी समोर जाणार आहे. हे प्रकरण संपल्यानंतर मनातील गोष्टी सांगण्यासाठी सर्वांशी संवाद साधणार आहे,” हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर जास्त भाष्य करुन नये असं कोर्टाने सांगितलं आहे. काही दिवसात सर्व सत्य समोर येईल आणि दूध का दूध, पानी का पानी होईल असंही ते म्हणाले.