अमळनेर (प्रतिनिधी):- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा यशस्वी समारोप उत्साहात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी दि १०,११ व १२ जानेवारी २०२५ या तीन दिवसीय विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे पहिल्या दिवशी डॉ.रोहित धर्माधिकारी (मुंबई) यांच्या हस्ते उद्घाटन व ध्वजारोहण झाले. या समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेशजी गुजराथी हे होते. खा.शि.मंडळाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष श्री.जितेंद्र देशमुख, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, संचालक डॉ.अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी, योगेश मुंदडे व चिटणीस तथा प्राचार्य डॉ ए. बी. जैन, प्राध्यापक प्रतिनिधी तथा उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, सहचिटणीस डॉ धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील, डॉ.व्ही. बी. मांटे, डॉ.अमित पाटील, डॉ.योगेश तोरवणे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी.मोरे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.विजय तुंटे (उपप्राचार्य) व प्रा.सी.बी. सुर्यवंशी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. सोनवणे, प्रा.रवींद्र माळी,शिक्षक प्रतिनिधी श्री.विनोद कदम पर्यवेक्षक प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.दिनेश भलकार उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उद्घाटनाच्या प्रारंभी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन व दोघे स्नेहसंमेलन प्रमुख यांनी आनंद मेळाव्याचे उदघाटन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रोहित धर्माधिकारी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण वाचन व मेहनत करावी. मेहनतीच्या जोरावर प्रताप महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असा मोलाचा सल्ला दिला.
डॉ.संदेशजी गुजराथी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतल्यास व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. असे मत व्यक्त केले.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दोन दिवसात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. यात रेकॉर्ड भेट,फाईन आर्ट गॅलरी व स्पोर्ट गॅलरी,मनोरंजनपर कार्यक्रम, काव्यवाचन,फॅन्सी ड्रेस,नाटीका, समूहनृत्य,गायन या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. याच दरम्यान युवारंग महोत्सवातील पारितोषिक प्राप्त विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार अनिल भाईदास पाटील (माजी मंत्री, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य) व प्रा.डॉ.अजयजी भामरे (प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांच्याबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य मंचावर उपस्थित होते. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध किस्से सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध कलागुण जोपासणे महत्त्वाचे आहे. असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच प्रा. डॉ. अजयजी भामरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. त्याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व सांगत नवनवीन कोर्सेस व योजनांचा फायदा घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सीए नीरजजी अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी काळाचे भान ओळखून ज्ञान संपादन करण्याच्या सूचना दिल्या तसेच आमचे विद्यार्थी पाडळसे धरणाच्या ठिकाणी अभ्यास दौ-यातून माहिती संकलित करतील, असा आशावाद व्यक्त केला.
प्रस्तुत उदघाटन व समारोप- बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रमेश माने,प्रा.प्रतिमा लांडगे व प्रा.शालिनी पवार यांनी केले. तर स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. विजय तुंटे व प्रा.सी.बी.सुर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
तीन दिवसीय स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष, आणि सर्व पदाधिकारी,प्रताप महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक प्रतिनिधी, कुलसचिव, कार्यालयीन अधिक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख, सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक,विविध समिती प्रमुख, सर्व प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.