भडगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव आणि आगामी सण, उत्सव कालावधीत डीजे सह इतर वाद्यांच्या आवाजाची मर्यादा व अटी व नियमांचे पालन करण्याची पोलिस दलाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. तरी देखील कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून सार्वजनीक शांतता भंग करत केल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला डीजे धारकाच्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दि. 18 सप्टेबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भडगांव शहरातील बाळद रस्त्यावर मोठ्या आवाजात विना परवाना मिरवणूकीत डीजे लावण्यात आला होता. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमएच 43 एफ 8058 या डीजे वाहनावर 44 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डीजे मालक तुषार पाटील आणि राकेश बाग या दोघांविरुद्ध पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे यांनी ही कारवाई केली आहे.
















