भडगाव (प्रतिनिधी) रस्त्याने पायी चालणार्या कनाशी येथील तरुणाचा रस्ता अडवून मारहाण करीत तिघांनी रोकडसह मोबाईल लांबवल्याची घटना कजगाव-कनाशी रस्त्यावर सोमवारी रात्री 10.30 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात तिघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर राजेंद्र भदाणे (26, कनाशी, ता.भडगाव) हा तरुण व्यवसायाने चालक असून बुधवारी रात्री 10.30 वाजता कजगाव-कनाशी रस्त्यावरून पायी चालत होता. लोणपिराचे गावाकडे जाणार्या रस्त्यावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तरुणाचा रस्ता अडवत त्याला शिविगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील 13 हजार 100 रुपये किंमतीचा मोबाईल व एक हजार दोनशे रुपयांची रोकड हिसकावून तरुणाला रस्त्यावर ढकलून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.