साकळी (प्रतिनिधी) देशासह संपुर्ण राज्यात कोरोना विषाणु महामारी मागील सहा महिन्यापासुन सर्वत्र थैमान घातले असतांना यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या ग्राम पंचायतीचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेय. गावातील सांडपाण्याचे दुर्गंधीयुक्त घाणीचे पाणी बाहेर करणारी भुमीगत गटारीचे प्रभाग क्रमांक ३ मधील काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे केल्याने घाणीचे पाणीची पाईप लाईन ही उघडयावर आल्याने ठीक ठीकाणी फुटली आहे. यादुर्गंधीचे सांडपाणी हे रहदारीच्या मार्गावर येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. या प्रश्नाकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे.
या संदर्भातील वृत असे की, यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या साडे तिन हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गावाला किनगाव खुर्द, मध्ये उघडया पाईप लाईन मुळे कोरोनाच्या काळात ग्रामस्थांचे आरोग्यास धोकात आले आहे. ग्रामपंचायत सर्वत्र घाणीचे साम्राज्य ग्राम पंचयातीच्या माध्यमातुन मागील दिवसापुर्वी शासनाच्या योजने अंतर्गत लाखो रुपयांचे निधी खर्च करून प्रभाग क्रमांक तिन मधील लोकवस्तीतील घाणीचे सांडपाणी गावाबाहेर काढण्याकरीता गावात स्वच्छता निर्माण योजनेव्दारे भुमीगत गटारी टाकण्यात आल्या असुन या गटारींच्या कामात आर्थिक व्यवहार झाल्याने संबधींत ठेकेदारांने सदरचे भुमीगत गटारींचे काम हे निकृष्ट प्रतिचे केल्याने या मुळे कमी खोलीच्या गटारीत वरवरच पाईपलाईन टाकल्याने दुर्गंधीच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागावा.
या दृष्टीकोणातुन टाकण्यात आलेली भुमीगत गटारी या मागील काही दिवसांपासुन गावाच्या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी ठेकेदाराकडुन वरवर पाईपलाईन टाकण्या आली असल्याने पावसात या पाईपलाईनवर टाकण्यात आलेल्या मातीचा भराव वाहुन गेल्याने सदरची पाइपलाईन कमी खोलीच्या खडुयात असल्याने माती वाहुन गेल्याने ती उघड्यावर पडल्याने रस्त्यांने जाणाऱ्या वाहनांमुळे सांडपाण्यासाठी असलेली पाईपलाईन फुटल्यास प्रभागातील सार्वजनिक रस्त्यावर दुर्गंधीचे व घाणीने मिश्रीत सांडपाणी या पाईपलाईन द्वारे गावात झाल्यास घाणीच्या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला असुन , ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन झालेल्या या सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी टाकण्या आलेल्या भुमीगत गटारीच्या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून ग्रामपंचायतच्या माध्यमातुन आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी चुकीची मार्गाने झालेल्या कामाची संबधीत पुनश्च दुरूस्ती करून ग्रामस्थांच्या आरोग्यास होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.
या भुमीगत सांडपाण्यासाठी झालेल्या गटारींच्या कामाची माहीती या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते सादीक शाह यांनी माहीती अधिकारा व्दारे संबधीत कामाची सविस्तर माहिती मागीतली असता ग्रामपंचायती कड्डन सदर माहीती मिळत नसल्याची उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची ओरड सादीक शाह यांनी केली आहे .किनगाव खुर्द , या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ह्या संसर्गाच्या आजारामुळे आतापर्यंत गावातील चार जणांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे व पावसाळ्यामुळे ठिकाणी गटारी तुंबून वाहत आहे व उघडया पाईप लाईन मुळे ग्रामस्थांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असे असतांना पंचायत समिती अधिकारी , ग्रामसेवक, सरपंच व या प्रभाग क्रमांक तिनचे सदस्य दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. त्यामुळे ग्रापंचायतीवर व ग्रामसेवक यांच्या कारभाराला घेवुन गावात नाराजी पसरली आहे.