जळगाव प्रतिनिधी : जळगावातील शनिपेठ परिसरातील जय श्रीराम बहुद्देशीय मंडळ यंदा त्यांच्या स्थापनेच्या २६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही मंडळ उत्साहात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक खास आकर्षण ठरणार आहे. या मिरवणुकीत महिला आणि पुरुष सदस्य पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणार आहेत. लेझीम नृत्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे.
मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली यंदाची कार्यकारणी कार्यरत आहे. यामध्ये उपाध्यक्ष कुणाल कांकरिया, सचिव गणेश माळी, सहसचिव अक्षय जोशी, खजिनदार मयूर चौधरी आणि कार्याध्यक्ष विजय देवरे यांचा समावेश आहे.
मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख सल्लागार म्हणून दत्तात्रय जोशी, ताराचंद जोशी, लालचंद जोशी, चेतन वाणी, कृष्णा देवरे, विक्की चौधरी, शिवाजी चौधरी, गोपाल देवरे, आणि विवेक भट हे अनुभवी सदस्य कार्यरत आहेत. मंडळाचे सदस्य राकेश जोशी, गौरव चौधरी, हर्षल चौधरी, गणेश चौधरी, मोहित प्रजापती, ललित चौधरी, पवन चौधरी, साहिल जोशी, निखिल जोशी, आणि गोलू बोरकर हेही विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतला असून, यंदाही विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. मंडळातर्फे दरवर्षी भजन संध्या आणि विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते. गेल्या २६ वर्षांपासून मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.