धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवारातर्फे धरणगाव येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज (दि. 1 सप्टेंबर) रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि बालकवी ठोंबरे विद्यालयाचे सचिव आर एन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 315 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील 54 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तात्काळ पनवेल येथे रवाना करण्यात आले.
धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात आज रविवारी गुलाबराव पाटील मित्र परिवारातर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि बालकवी ठोंबरे विद्यालयाचे सचिव आर एन महाजन यांच्या हस्ते झाले. नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरादरम्यान रुग्णांची तपासणी सुरू असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः उपस्थित होते. या शिबिरात 315 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यातील 54 रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशनसाठी तात्काळ पनवेल येथील झुंझुनवाला आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णांसाठी प्रवास, जेवण व राहण्याची व्यवस्थाही जीपीएस मित्र परिवारातर्फे करण्यात आली आहे. तसेच पनवेल येथे ऑपरेशन करिता जाणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि रुग्णांनी धरणगाव शिवसेना शाखा आणि गुलाबराव पाटील मित्र परिवाराचे आभार मानले.
याप्रसंगी शहरातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता दिवसभर मेहनत घेतली. तसेच यावेळी आर.एन. महाजन सर, मुकुंदभाऊ नन्नवरे, पप्पू भावे, एड. संजय महाजन, संजय चौधरी, विलास महाजन, कमलेश तिवारी, दीपक पाटील, संजय पवार, भूषण पाटील, अभिजित पाटील, शिरीषअप्पा बयस, जिजाबराव पाटील, विजय महाजन, वासुदेव चौधरी, बुटा पाटील, बाळू जाधव, प्रशांत देशमुख, वाल्मीक पाटील, पवन महाजन, कन्हैया रायपूरकर, दिलीप महाजन, सोनू महाजन, तौसिफ पटेल, जीवन पाटील सर, आकाश महाजन, भावेश पाटील, पप्पू कंकरे, रवी धनगर, संतोष महाजन, रवी महाजन, अजय मेराळे, तन्मय वाघरे, विनायक महाजन, कमलेश बोरसे, धिरेन पुरबे, मोनु महाजन, पप्पू महाजन, चेतन पाटील, मयूर मोरारकर, दीपक भदाने, समाधान पाटील, अनिल महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.














