लासलगाव (प्रतिनिधी) येथील कृष्णाई हॅास्पिटलचा प्रथम वर्धापन दिन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे तसेच मला (कुणाल दराडे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
माझ्या हस्ते हॉस्पिटलच्या बल्ड बॅंकेचे ऊद्घाटन करण्यात आले. लासलगाव पंचक्रोशीतील जनतेसाठी हॉस्पिटलने नवीन सुविधा दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुक केले. गोरगरिंबासाठी अजून नवीन योजना सुरू करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लासलगाव डॅाक्टर्स असोसिएशनच्या कार्याचा गौरव केला.
ना. गुलाबराव पाटील यांच्या समवेत यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, सुवर्णाताई जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, शिवा भाऊ सुराशे, नितीन आहेर, डॉ. योगेश चांडक, डॉ. विलास कांगणे, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. विकास चांदर, डॉ. अमोल गायकर सन्मानीय व लासलगावकर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विविध विकासकामे तसेच मतदारसंघातील प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. विविध प्रश्नांना चालना देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.