जळगाव (प्रतिनिधी) एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी जवळपास पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. कर्मचारी मागे हटत नसल्याने बससेवा पुर्ववत करण्यासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना आज एसटीचे स्टेअरींग हाती दिले. बराच गोंधळानंतर धुळ्यासाठी आज पहिली बस रवाना करण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे बससेवा थांबलेली आहे. यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडगा निघत नसल्याने कर्मचारी संप मागे घेत नसून ठाम आहे. यामुळे अद्यापपर्यंत आंदोलन सुरूच आहे. मात्र आज पोलिस बंदोबस्तात सेवा सुरू केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे चालक भरती प्रक्रीयेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर बोलावून आज जळगावातून एसटी महामंडळाने सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज तब्बल १५ दिवसांनंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगावहून धुळ्यासाठी पहिली बस (क्र. एमएच २०, बीएल ३९३६) जळगाव आगारातून बाहेर पडली.