TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंच्या सांगण्यावरून सर्व घडले ; तेजस मोरेचा खळबळजनक आरोप !

जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बील गुगल पे वरुन भरल्याचाही दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळले होते. प्रविण चव्हाण यांनी त्यांचा अशिल तेजस मोरे याच्यावर गंभीर आरोप केला होता. यानंतर आता तेजस मोरे याने चव्हाण यांचे आरोप फेटाळले आहेत. ते स्टिंग मी केलेच नाही. तसेच मी केवळ फिर्यादी आणि चव्हाण यांच्यातील दुवा होतो. अगोदर अनिल देशमुख आणि नंतर एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडल्याचे तेजस मोरे याने सांगितले.

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल तेजस मोरे याने खुलासा केला आहे. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामध्ये छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रविण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान तेजस मोरे यांनी केले आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या ज्या व्हिडीओमधे मी उपस्थित आहे. त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, असा दावा तेजस मोरे यांनी केला आहे.

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

महाजन यांचे प्रकरण असो यासंदर्भातील वेगवेगळे जबाब तयार करून घ्यायचे

तेजस मोरे म्हणाले की, प्रवीण चव्हाण यांना मी जुलै २०२१ पासून ओळखत आहे. मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते, त्या गुन्ह्यात त्यांनी मला जामीन मिळवून दिला होता. जामीन झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात माझे जाणे-येणे होत होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की जबाबासंदर्भातील दोन-तीन ड्राफ्ट करायचे आहेत. माझे इंग्लिशवर कमांड नाही. तुझं इंग्लिश चांगलं असल्यामुळे तू मला ड्राफ्ट तयार करून दिले तर बरं होईल. त्याअनुषंगाने माझे त्यांच्या कार्यालयात जाणे-येणे वाढले. मात्र, ते कशाचे ड्राफ्ट तयार करत आहेत, हे त्यावेळी मला माहीत नव्हते. जसजसं मी ड्राफ्ट करायला लागलो, तसतसं मला समजायला लागले की रमेश कदम, बीएचआर बॅंक, रवींद्र बराटे किंवा गिरीश महाजन यांचे प्रकरण असो यासंदर्भातील वेगवेगळे जबाब तयार करून घ्यायचे. पोलिसांना पुरविण्यात येणारी माहितीही तेच पहायचे. हे सर्व ते माझ्याकडून करून घ्यायचे.

सरकारी वकिल छापा टाकण्याचे मॅनेज करत आहेत आणि पोलिस त्यांचे ऐकतात, हे कसं काय?

मला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे ते काय करत आहेत, हे मला समजायचे नाही. मला वाटायचं की हे सरकारी वकिलाचे काम आहे. कारण, त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे त्याबाबतचे ज्ञान नसल्यामुळे मला त्यात गैर काही वाटायचे नाही. ते जे सांगायचे, ते मी करत जायचो. गिरीश महाजन यांच्यासंदर्भात जबाब देण्यासाठी जे साक्षीदार यायचे, त्यांचे जबाब हे चव्हाण करून घ्यायचे. ते जबाब देण्यासाठी मलाही पोलिस ठाण्यात चव्हाण पाठवायचे. पण ९ जानेवारी रोजी जो छापा टाकण्यात आला. त्यानंतर माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. सरकारी वकिल छापा टाकण्याचे मॅनेज करत आहेत आणि पोलिस त्यांचे ऐकतात, हे कसं काय, असा प्रश्न मला पडला, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

पुणे पोलिसांकडून भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट

अनेक खटल्यांचे जबाब मी नोंद केले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी नोंद केले आहेत.परंतु, पुणे पोलीस गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले. कारण पुणे पोलिसांकडून भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट करण्यात आले होते. माझे दोन-तीन वकील मित्र आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर समजले की चव्हाण जे करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यापासून मी हळूहळू बाजूला होत गेलो, असा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे.

गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न

जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बील देखील मी गुगल पे वरुन भरले आहे. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांकडून बनावट पुरावे तयार करुन ते भोईटेंच्या घरात प्लांट करण्यात आले. काहीही करुन गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता,असा खुलासा तेजस मोरे यांनी केला आहे.

प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती

“गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे प्रविण चव्हाण यांना सांगत होते. मी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच भेटलेलो नाही. प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती आहे. त्यामुळे मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय ठरला ऋषभ पंत ; मोडला कपिल देव यांचा विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..’व्हॅलेंटाईन डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 14, 2022

जळगाव : गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर एसीबीची कारवाई ; गुन्हा दाखल !

February 1, 2025

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

May 28, 2021

स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या राज्यस्तरिय नृत्यस्पर्धेत शेवगावची आरोही प्रथम तर पुण्याची आर्या द्वितीय

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group