TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना येत्या सोमवार, दि. १ नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध आहे. ही सेवा सोयीची व सुरक्षित असून महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरीत आहेत.

 

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर दि. १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे ग्राहकांना वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यासाठी यापुढे पाच हजार रुपयांची मर्यादा राहणार आहे. परंतु त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध आहे. तसेच धनादेशाद्वारे देखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. तथापि मुदतीनंतर धनादेश क्लीअर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश अनादरित झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे.

 

वीजबिलांपोटी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ची सोय उपलब्ध आहे. महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे, ‘ऑनलाईन’ भरणा करणे तसेच मागील पावत्या व तपशील पाहणे ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांचे बील भरण्यासह इतर सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५००/- रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. क्रेडीटकार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा हा निशुल्क आहे.

 

वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसेच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीज बिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. सद्यस्थितीत महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा सुमारे १४०० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’द्वारे भरणा करीत आहेत.

 

तसेच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी कोरोना महामारीच्या काळात रांगेत उभे राहून किंवा इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन : डीआयजी बी. जी. शेखर

September 25, 2021

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

July 29, 2024

मोठी बातमी : अमेरिकेत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींविरोधात गुन्हा दाखल !

September 1, 2022

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९६.५७ टक्क्यांवर

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group