जळगाव (प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर फरार असलेल्या जयंत अनंत शिधये (वय ६२, रा. ढाके वाडी) या आरोपीच्या शहरातील खोटेनगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
न्यायालयाकडून जयंत शिधये याचे अजामीनपात्र व शिक्षेस पात्र असलेले वॉरंट प्राप्त झाले होते. सदर आरोपी हा खोटेनगरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, प्रीतम पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, लोकेश माळी, मोतीलाल चौधरी यांचे पथक केले व आरोपीला अटक करण्याविषयी सूचना दिल्या. त्यानुसार हे पथक खोटेनगर येथे पोहचले. तेथे शोध घेतला. असता आरोपी सापडला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.