जळगाव (प्रतिनिधी) लग्नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर करीना सागर निकम (वय १९) या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. मयत करीना हिने आत्महत्या केली नसून तिच्या पतीसह सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप तिची आई सुलोचना समाधान भालेराव (रा. खिरोदा ता. रावेर) यांनी केला आहे.
करिनाला मारझोड करत दमदाटी करुन सासरे राजू निकम तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांनी जबदरस्तीने करीनाचा विवाह केला. करीना मरायला खूप घाबरत होती, त्यामुळे ती आत्महत्या करु शकत नाही, तिला सासरच्यांनीच मारले असल्याचा आरोप यावेळी मयत करीनाची आई सुलोचना हिने जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
दरम्यान, घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात माहेरच्या तसेच सासरचे नातेवाईक एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला होता.