जळगाव (प्रतिनिधी) खान्देश हा विविध लोकसाहित्य व लोककलांनी समृद्ध असा प्रदेश असुन खान्देशातील तमाशा परंपरेला शंभर वर्षाचा इतिहास आहे. पंरतु काल ओघात आजच्या प्रसार माध्यमांच्या युगात तमाशा लोककलेची झालेली दुरवस्था व त्यामुळे लोप पावत चाललेल्या या तमाशा लोककलेच्या जतन व संवर्धना साठी शासन कटीबद्ध असल्याची भावना खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष तथा तमाशा प्रशिक्षण शिवबिराचे संचालक शेषराव गोपाळ यांनी व्यक्त केले
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जळगाव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जळगाव शहरातील नटवर माॅल येथील भरारी सांस्कृतिक हाॅल येथे आयोजित करण्यात आले आहे. या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, महाराष्ट्र चित्रपट अनुदान समिती च्या सदस्य गीतांजली ताई ठाकरे खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष तथा तमाशा प्रशिक्षण शिबिराचे शिबिर संचालक शेषराव गोपाळ यांनी केले. तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सलग २० दिवस तमाशाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार असून. तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी तमाशा क्षेत्रातील नामवंत व दिग्गज तमाशा कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी समारोपीय कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मा. मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तमाशा प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा दिल्या असून भविष्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तमाशा प्रशिक्षण शिबीर आयोजना साठी खान्देश लोककलांवंत विकास परिषदेचे विशेष सहकार्य लाभले असुन खान्देशात लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत युवक युवतींनी या प्रशिक्षण शिबिराचा लभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकासजी खारगे व संचालक विभिषण चावरे यांनी केले आहे.