जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील चार वर्षीय बालीके सोबत अत्याचार केलेल्या सावळाराम भानुदास शिंदे यास जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश एस एन माने- गाडेकर यांनी अत्यंत कमी वेळेत म्हणजे फक्त ६० दिवसात सुनावणीअंती मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याबद्दल जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने जिल्हा सरकारी वकील केतन ढाके व पोलीस उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग कैलास गावंडे या दोघांचा न्यायालयात जाऊन शाल, बुके व साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती हे पुस्तक देऊन सत्कार केला.
तारीख -पे -तारीख ला खो देत न्यायपालिका व प्रशासनाची समाजाने घेतली दखल
पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास व त्यातील वेळकाढूपणा, त्यानंतर न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल झाल्यानंतर न्याय पालिकेची तारीख पे तारीख ही म्हण या प्रकरणी १००℅ खोटी पडली असून प्रशासनाने म्हणजे पोलीस विभाग, आरोग्य विभागातिल डॉक्टर व प्रयोगशाळाचे सहकारी, साक्षीदार तसेच सर्वात महत्त्वाचे सरकारी वकील यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावल्याने न्याय देवता ने वेळीच आपले कार्य तत्परतेने केल्याने संपूर्ण मानव जातिने त्यांचे आभार मानले व त्याचे प्रतीक म्हणून जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने प्रातिनिधिक स्वरूपात पोलिस विभागाचे तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी कैलास गावंडे व विशेष सरकारी वकील केतन ढाके यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आभार मानून त्यांचे अभिनंदन केले आहे.
फाशीसाठी सरकारने अपिलात जावे
सावळाराम या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी जळगाव पोलीस दल व सरकारी वकील यांनी शासनातर्फे उच्च न्यायालयात दाद मागून त्या नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीसुद्धा यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केली आहे.
जिल्हा बार संघटनेचे अध्यक्ष बोरसे यांच्या साक्षीने सत्कार
जळगाव जिल्हा वकील संघाचेचे अध्यक्ष अँड. दीलिप बोरसे यांच्या कारकिर्दीत वकील संघाचे सदस्य तथा सरकारी वकील केतन ढाके यांनी उत्कृष्टरित्या आपले कर्तव्य निभावल्या ने वकील वकील संघाचे अध्यक्ष दीलिप बोरसे यांच्या उपस्थित मनियार बिरादरीचे अँड. आमीर शेख, अध्यक्ष फारुक शेख खजिनदार ताहेर शेख, सदस्य तय्यब शेख, रफिक शेख, तनवीर शेख, मुजाहिद खान व अलताफ शेख यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यांचे सुद्धा मानले आभार
मनियार बिरदारीने सदर शिक्षेबाबत ठलक पणे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने बातमी प्रसिद्व केल्याने शिक्षा व ६० दिवसातिल निकाला मुळे गुन्हेगार मध्ये भीति निर्माण झाली म्हणून सर्व माध्यमाचे संपादक व वार्तहर, पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, चालीसगाव पो स्टे चे पो.नी व सर्व सहकारी, सरकारी वकील कार्यालायतिल सहकारी व शासनाने आरोपी च्या बचावासाठी दिलेले विशेष वकील दर्जी ज्यांनी सुद्धा वेळकाढू पणा न करता सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून कौतुक केले आहे.