TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लवकरच होणार केळी विकास महामंडळाची स्थापना- फलोत्पादन मंत्र्यांची घोषणा !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा : लवकरच साकार होणार महामंडळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

जळगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आलेल्या केळी महामंडळाची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेत केली. तर, ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात केलेल्या चर्चेनुसार पहिल्या टप्प्यात महामंडळासाठी ५० कोटी रूपयांचा निधी मिळणार असून अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह १५ जणांचा कर्मचारीवृंद या महामंडळाला मिळणार आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी केळी विकास महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्याच जळगाव दौर्‍यात १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र यानंतर राज्य शासनातर्फे या संदर्भात अद्याप देखील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. मध्यंतरी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नियोजीत केळी विकास महामंडळाला दिवंगत नेते हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री व इतर सहकारी मंत्री महोदयांशी चर्चा करून मागणी केली आहे. याबाबत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या अनुषंगाने आज विधानपरिषदेत केळी विषयावर चर्चा झाली. यावर राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी केळी विकास महामंडळ लवकरात लवकर अस्तित्वात येणार असून आपली या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे ना. भुमरे म्हणाले. यामुळे आता लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आजच केळी विकास महामंडळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यात लवकरच महामंडळ कार्यरत होणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात साधारणपणे ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह एकूण १५ कर्मचारीवृंदाची तरतूद देखील करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने केळी विकास महामंडळाची स्थापना केल्याची बाब जळगाव जिल्ह्यासाठी खूप महत्वाची आहे. जळगाव जिल्हा केळीचे आगार म्हणून समजला जातो. केळी उत्पादकांना अनेक समस्या भेडसावत असून याचे निराकरण करण्यासाठी एकाच ठिकाणी संशोधनासह मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी पहिल्यांदा या संदर्भातील प्रस्ताव पाठवून याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणली. यानंतर हे महामंडळ प्रत्यक्षात साकारावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. याचमुळे आज महामंडळाच्या स्थापनेबाबत फलोत्पादन मंत्र्यांनी अधिकृत घोषणा केली.
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठविण्यापासून ते प्रत्यक्षा साकार होण्यापर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे. आज ना. संदीपान भुमरे यांच्या घोषणेमुळे आपण केळी विकास महामंडळाच्या स्थापनेच्या एक पाऊल अजून जवळ आलो असून साधारणपणे दोन महिन्यात हे महामंडळ प्रत्यक्ष साकारण्यात आलेले असेल असा मला विश्‍वास वाटतो.
दरम्यान, नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या केळी विकास महामंडळाचे मुख्य कार्यालय हे जळगाव येथे राहणार असून यातून झालेल्या संशोधनाच्या आणि येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

कारचे नियंत्रण सुटले...झाडावर आदळली, एअरबॅग उघडल्या...तरी घात झालाच ; अभियंत्यासह दोघे ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026

केरळमध्ये कोरोनाची लस ‘मोफत’ ; मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची घोषणा

December 13, 2020

25 हजारांची लाच स्वीकारताना तलाठासह तिघांना एसीबीने केली अटक !

August 1, 2025

‘अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा’ : राहुल गांधी

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group